YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 67:1-7

स्तोत्रसंहिता 67:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा. याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील. हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत. भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो. देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.

स्तोत्रसंहिता 67:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे, तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे. हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत. राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत. कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे; परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात. परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.

स्तोत्रसंहिता 67:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देवाने आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा; त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा; (सेला) ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत; कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला) हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत; सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो. देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.