स्तोत्रसंहिता 66:17-20
स्तोत्रसंहिता 66:17-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती. जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते. पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.
स्तोत्रसंहिता 66:17-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
साहाय्यासाठी मी मुखाने त्यांचा धावा केला; आणि माझ्या जिभेवर त्यांची स्तुती होती. मी माझी पातके माझ्या अंतःकरणात ठेवली असती, तर परमेश्वराने माझा धावा ऐकला नसता; परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे. परमेश्वराचा धन्यवाद असो, त्यांनी माझी प्रार्थना अस्वीकार केली नाही, आणि माझ्यावर प्रीती करण्याचे नाकारले नाही.
स्तोत्रसंहिता 66:17-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता; पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे. देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.