स्तोत्रसंहिता 65:9-10
स्तोत्रसंहिता 65:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस
स्तोत्रसंहिता 65:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही या भूमीची काळजी घेता व ती सिंचनासाठी देता. आपण ते विपुल व समृद्ध करता. लोकांना धान्य मिळावे म्हणून परमेश्वराच्या नद्या पाण्याने भरल्या आहेत, कारण तुम्ही ते निर्धारित केले आहे. तुम्ही नांगरलेल्या सऱ्यांना पाणी देता आणि तुम्ही तिचे उंचवटे सपाट करता; पावसाच्या सरींनी तिला मऊ करता; तिच्या अंकुरांना आशीर्वाद देता.
स्तोत्रसंहिता 65:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.