स्तोत्रसंहिता 59:16-17
स्तोत्रसंहिता 59:16-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन; कारण देव माझा उंच बुरूज आहे, माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 59 वाचास्तोत्रसंहिता 59:16-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य आणि तुमची दया यांची गीते गाईन, कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात. हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे, कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा, तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 59 वाचास्तोत्रसंहिता 59:16-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन; कारण देव माझा उंच गड आहे, माझा देव दयामय आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 59 वाचा