स्तोत्रसंहिता 50:9-12
स्तोत्रसंहिता 50:9-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही. कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत. मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
स्तोत्रसंहिता 50:9-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही. कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत; पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.
स्तोत्रसंहिता 50:9-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या घरचा गोर्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही. कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे.