स्तोत्रसंहिता 42:1-3
स्तोत्रसंहिता 42:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
स्तोत्रसंहिता 42:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे. माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार? रात्र आणि दिवस, माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. मला लोक सतत असे विचारीत आहेत. “कुठे आहे तुझा परमेश्वर?”
स्तोत्रसंहिता 42:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? “तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.


