स्तोत्रसंहिता 37:3-6
स्तोत्रसंहिता 37:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर. परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील. तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
स्तोत्रसंहिता 37:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील. याहवेहमध्ये आनंद कर, म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील. तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर; त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील: तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल, तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.
स्तोत्रसंहिता 37:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल; म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.

