स्तोत्रसंहिता 36:1-12
स्तोत्रसंहिता 36:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अनीतीचे व कपटाचे असतात; त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहचले आहे; तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते! तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे; तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणार्यांस तुझे वात्सल्य सरळ मनाच्यांस तुझे नीतिमत्त्व लाभू दे. गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो; दुर्जनांचा हात मला हाकून न लावो. पाहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत! त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही.
स्तोत्रसंहिता 36:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही. त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो. त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही. तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही. हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे. परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो. देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू. राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे. गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. दुष्टाचा हात मला घालवून न देवो. तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 36:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुष्टांच्या पापांबद्दल माझ्या हृदयात याहवेहचा संदेश आहे. त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते. ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की, त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द कपटाचा आणि अनीतीचा असतो; शहाणपणा आणि चांगुलपणा करण्यात ते अपयशी होतात. ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात, ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात, आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत. याहवेह तुमची प्रीती स्वर्गापर्यंत, व तुमची सत्यता आकाशापर्यंत पोहोचली आहे. तुमचे नीतिमत्व विशाल पर्वतासारखे आहे, तुमचे न्याय अथांग खोलीसारखे आहेत. याहवेह, तुम्ही मनुष्य आणि प्राण्यांची जोपासना करता. हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते. तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता; आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता. कारण जीवनाचा झरा तुमच्याजवळ आहे; तुमच्या प्रकाशानेच आम्हाला प्रकाश मिळतो. जे तुम्हाला ओळखतात त्यांच्यावर तुमची प्रीती, व जे सरळ अंतःकरणाचे त्यांच्यावर तुमचे नीतिमत्व असू द्या. त्या गर्विष्ठ लोकांनी मला पायदळी तुडवू नये, दुष्टांचे हात मला बाहेर ढकलून देऊ नये. पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!