YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 34:1-6

स्तोत्रसंहिता 34:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल. मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या. मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला. जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत. या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.

स्तोत्रसंहिता 34:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन; माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन. याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन; हे ऐकून दीनजन हर्ष करोत. तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा; आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या. कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले; त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले. जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात; त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही. या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला; त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.

स्तोत्रसंहिता 34:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.