स्तोत्रसंहिता 33:18-22
स्तोत्रसंहिता 33:18-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे. आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे. त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो. परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
स्तोत्रसंहिता 33:18-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जे त्यांचे भय धरतात, ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते. ते त्यांना मृत्यूपासून सोडवून, दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात. आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत. त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे. याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या, कारण आमच्या आशेचे स्थान केवळ तुम्हीच आहात.
स्तोत्रसंहिता 33:18-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो.