स्तोत्रसंहिता 30:1-5
स्तोत्रसंहिता 30:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस. हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले. हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
स्तोत्रसंहिता 30:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले. याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले. अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.
स्तोत्रसंहिता 30:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस. अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.