YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 24:1-4 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 24:1-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.

स्तोत्रसंहिता 24:1-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील? ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

स्तोत्रसंहिता 24:1-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्रस्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.