स्तोत्रसंहिता 17:6-7
स्तोत्रसंहिता 17:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 17 वाचास्तोत्रसंहिता 17:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका. तुमचा आश्रय घेणार्यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 17 वाचास्तोत्रसंहिता 17:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुझा धावा केला आहे, कारण, हे देवा, तू माझे ऐकतोस; माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 17 वाचा