YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 17:1-5

स्तोत्रसंहिता 17:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत. तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे. मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे. माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत.

स्तोत्रसंहिता 17:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही. तुम्ही माझा रास्त न्याय करा; जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो. जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे, रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे, तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही; माझ्या मुखाने मी अपराध केले नाही. जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले. माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत, माझी पावले कधी घसरली नाहीत.

स्तोत्रसंहिता 17:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. माझा निवाडा तुझ्यापुढे होवो; तुझे डोळे समदृष्टीने पाहोत. तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहेस, तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, तरी तुला काही आढळले नाही; मी मुखाने अतिक्रमण करणार नाही, असा संकल्प मी केला आहे. माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले, तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे. माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत.