YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 16:7-11

स्तोत्रसंहिता 16:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते. मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही. त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो. कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.

स्तोत्रसंहिता 16:7-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते. मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही. तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

स्तोत्रसंहिता 16:7-11

स्तोत्रसंहिता 16:7-11 MARVBSIस्तोत्रसंहिता 16:7-11 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा