स्तोत्रसंहिता 148:1-6
स्तोत्रसंहिता 148:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची स्तुती करा. आकाशातून परमेश्वराची स्तुती करा; उंचामध्ये त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा. आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा. ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली. त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
स्तोत्रसंहिता 148:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा. त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.
स्तोत्रसंहिता 148:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेशाचे स्तवन करा!1 आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो, त्याचे स्तवन करा; त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा; अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्यांनो, त्याचे स्तवन करा. आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो, त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.