YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 147:15-18 - Compare All Versions

स्तोत्रसंहिता 147:15-18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.

स्तोत्रसंहिता 147:15-18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो. शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात. ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल? परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.

स्तोत्रसंहिता 147:15-18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. तो आपल्या बर्फाचा चुर्‍याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते.