स्तोत्रसंहिता 145:14-16
स्तोत्रसंहिता 145:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात. सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता. तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.
स्तोत्रसंहिता 145:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
स्तोत्रसंहिता 145:14-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात. सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता. तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.
स्तोत्रसंहिता 145:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पतन पावणार्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणिमात्रांची इच्छा पुरी करतोस.