स्तोत्रसंहिता 14:1-3
स्तोत्रसंहिता 14:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
स्तोत्रसंहिता 14:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
स्तोत्रसंहिता 14:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले; ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.