स्तोत्रसंहिता 139:7-10
स्तोत्रसंहिता 139:7-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.
स्तोत्रसंहिता 139:7-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू? मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच. मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली, तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.
स्तोत्रसंहिता 139:7-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस; अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पाहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील.