स्तोत्रसंहिता 139:3-6
स्तोत्रसंहिता 139:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस. हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 139:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे. हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे, की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे.
स्तोत्रसंहिता 139:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागूनपुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.