स्तोत्रसंहिता 133:1-3
स्तोत्रसंहिता 133:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे. ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे. सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
स्तोत्रसंहिता 133:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात, ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या, अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या, झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे. हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
स्तोत्रसंहिता 133:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे; सीयोन डोंगरावर उतरणार्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे.