YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 122:1-9

स्तोत्रसंहिता 122:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

स्तोत्रसंहिता 122:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.” अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे. यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे, जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी. हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत. इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे. यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो. तुझ्या तटांच्या आत शांती नांदो; तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो. जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो.” आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ, तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.

स्तोत्रसंहिता 122:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत. हे यरुशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्‍यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.