स्तोत्रसंहिता 103:1-5
स्तोत्रसंहिता 103:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो. तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
स्तोत्रसंहिता 103:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको. जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात, जे तुझे सर्व रोग बरे करतात. जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात; आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात. जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात; म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते.
स्तोत्रसंहिता 103:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो; तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो; तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो; तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते.