YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 8:6-10 - Compare All Versions

नीतिसूत्रे 8:6-10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत. रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 IRVMAR

नीतिसूत्रे 8:6-10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. जे समजूतदार आहेत त्यांच्यासाठी ते योग्य आहेत; ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे त्यांना माझी वचने सुबोध आहेत. चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.”

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 MRCV

नीतिसूत्रे 8:6-10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या.

सामायिक करा
नीतिसूत्रे 8 MARVBSI