नीतिसूत्रे 8:12-13
नीतिसूत्रे 8:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे. परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचानीतिसूत्रे 8:12-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत. याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचानीतिसूत्रे 8:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा