नीतिसूत्रे 6:16-19
नीतिसूत्रे 6:16-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो, त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ, निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात, मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते, पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात, लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
नीतिसूत्रे 6:16-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो: गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात, हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात. खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
नीतिसूत्रे 6:16-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे : उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी, व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत.