YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 5:15-23

नीतिसूत्रे 5:15-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां? ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत. तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा. कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे? मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो. दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील. शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा

नीतिसूत्रे 5:15-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी. तुझे पाण्याचे झरे भरून रस्त्यांवर वाहून जावेत काय, तुझे पाण्याचे प्रवाह भर चौकात वाहावेत काय? ते फक्त तुझ्यासाठीच असावेत, अनोळख्यांबरोबर ते कधीच वाटली जाऊ नयेत. तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे. प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस. माझ्या मुला, तू दुसर्‍या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस? कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात. दुष्ट मनुष्याचा नाश स्वतःच्याच पातकांनी होतो; त्याचीच पातके दोर बनून त्याला पाशात पकडून ठेवतात. कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा

नीतिसूत्रे 5:15-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय? ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्‍यांना त्यांचा उपयोग न घडो. तुझ्या झर्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.

सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा