नीतिसूत्रे 4:4-7
नीतिसूत्रे 4:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले, “तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो; माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा. ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर; माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस; ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील. ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
नीतिसूत्रे 4:4-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले, “तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल. सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर; माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस. सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल. सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
नीतिसूत्रे 4:4-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती मला शिकवी व म्हणे, “माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो; ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर; ती विसरू नकोस, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्मुख होऊ नकोस; ते सोडू नकोस म्हणजे ते तुझे संरक्षण करील; त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील. ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर.