नीतिसूत्रे 30:18-20 - Compare All Versions
नीतिसूत्रे 30:18-20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन गोष्टी माझ्या समजापलीकडे आहेत, चार मला कळत नाहीत : गरुडाचे आकाशात उडणे, सर्पाचे खडकावर सरपटणे, जहाजाचे समुद्रावर चालणे, व पुरुषाचा तरुणीशी संबंध. जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.”
नीतिसूत्रे 30:18-20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही.
नीतिसूत्रे 30:18-20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला फारच आश्चर्यचकित करणार्या तीन गोष्टी आहेत. चार गोष्टी मला समजत नाहीत: गरुडाचा आकाशातील मार्ग, खडकावरून सरपटणारा साप, खवळलेल्या समुद्रात तरंगणारे जहाज, पुरुषाचा तरुणीशी संबंध? “व्यभिचारी स्त्रीचा मार्ग असा आहे: ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते, ‘मी काहीच वाईट केले नाही.’