YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 26:13-28 - Compare All Versions

नीतिसूत्रे 26:13-28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.” दरवाजा आपल्या बिजागर्‍यांवर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरुणावर लोळतो. आळशी आपला हात ताटात घालतो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. योग्य उत्तर देणार्‍या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो. दुसर्‍याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणार्‍या कुत्र्याचे कान धरून ओढणार्‍यासारखा होय. जो आपल्या शेजार्‍याला फसवतो आणि म्हणतो की, “मी थट्टा नव्हतो का करीत?” तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणार्‍या वेड्यासारखा आहे. सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. निखार्‍याला जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण, तसा भांडण पेटवायला भांडखोर लागतो. कानी लागणार्‍याचे शब्द रुचकर पक्‍वान्नासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो; तो गोडगोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्याच्या हृदयात सात विषे आहेत; त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 26 MARVBSI

नीतिसूत्रे 26:13-28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो. आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते. विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो. जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे. जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो, तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय? लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात. जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो. गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात. जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे. जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो, आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो; तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत; तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल, आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल. जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 26 IRVMAR

नीतिसूत्रे 26:13-28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” दार त्याच्या बिजागर्‍यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो. आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो. स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे. आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात. जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो, तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्‍यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!” लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते. जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे. शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात. जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते. त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल. जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल. लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.

सामायिक करा
नीतिसूत्रे 26 MRCV