नीतिसूत्रे 25:15-28
नीतिसूत्रे 25:15-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते. जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील. शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका, जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल. जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे. संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे. जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे. तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे; असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल. उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो. भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे. तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे. जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे, तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे. खूप मध खाणे चांगले नाही, सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे. जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल, तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.
नीतिसूत्रे 25:15-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते. तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल. तुझ्या शेजार्यांकडे पाय क्वचितच टाक— अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील. शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे. संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे. ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्यासारखे आहे. तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील. जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते. भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे. दूरवरून आलेला शुभ संदेश तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे. नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे, हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे. जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते. स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे.
नीतिसूत्रे 25:15-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल. शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे. संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे. थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे; असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले. तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.