नीतिसूत्रे 22:2-4
नीतिसूत्रे 22:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात. परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचानीतिसूत्रे 22:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचानीतिसूत्रे 22:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सधन व निर्धन ह्यांचा एकमेकांशी व्यवहार असतो. त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. नम्रता व परमेश्वराचे भय ह्यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.
सामायिक करा
नीतिसूत्रे 22 वाचा