नीतिसूत्रे 2:10-12
नीतिसूत्रे 2:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील
नीतिसूत्रे 2:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील. दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल. ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील
नीतिसूत्रे 2:10-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल, तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल. सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील.