नीतिसूत्रे 1:7-9
नीतिसूत्रे 1:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचानीतिसूत्रे 1:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस. ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचानीतिसूत्रे 1:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.
सामायिक करा
नीतिसूत्रे 1 वाचा