फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10
फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती.
फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती.
फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा. माझ्यापासून तुम्ही जे सर्वकाही शिकला किंवा स्वीकारले किंवा ऐकले, किंवा मजमध्ये पाहिले त्यानुसार आचरण करा आणि शांती देणारे परमेश्वर तुम्हाबरोबर राहतील. मी प्रभूमध्ये स्तुती करतो की शेवटी तुम्हाला माझ्याविषयीची पुन्हा काळजी उत्पन्न झाली. तुम्ही खरोखर काळजी करीत होता हे मला माहीत आहे, पण ते तुम्हाला प्रकट करण्याची संधी मिळाली नाही.
फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत, व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होता; पण तुम्हांला संधी नव्हती.
फिलिप्पैकरांस पत्र 4:8-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा. माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती.