YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. मी पुन्हा सांगतो आनंद करा. तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील. शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8

फिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 MARVBSIफिलिप्पैकरांस पत्र 4:4-8 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा