फिलिप्पैकरांस पत्र 4:2-3
फिलिप्पैकरांस पत्र 4:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा. आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
फिलिप्पैकरांस पत्र 4:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेस विनंती करतो की प्रभूमध्ये एकमनाचे व्हा. होय, माझ्या जिवलग मित्रा, मी तुलाही विनवितो की या भगिनींना साहाय्य कर; कारण शुभवार्तेसाठी माझ्या बरोबरीने, तसेच क्लेमेंत आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, अशा माझ्या इतर सहकार्यांबरोबर देखील त्यांनी श्रम केले आहेत.
फिलिप्पैकरांस पत्र 4:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी युवदीयेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खर्या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
फिलिप्पैकरांस पत्र 4:2-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी युवदीयेला व संतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूमध्ये एकचित्त व्हा. तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर.