फिलिप्पैकरांस पत्र 4:11-13
फिलिप्पैकरांस पत्र 4:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 4:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे. मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे. जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 4:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.
फिलिप्पैकरांस पत्र 4:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.