फिलिप्पैकरांस पत्र 3:19-20
फिलिप्पैकरांस पत्र 3:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.
फिलिप्पैकरांस पत्र 3:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे. परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.
फिलिप्पैकरांस पत्र 3:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत
फिलिप्पैकरांस पत्र 3:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते. आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.