YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-5

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पौल व तीमथ्य, ख्रिस्त येशूचे दास ह्यांच्याकडून; फिलिपै शहरातील ख्रिस्त येशूमध्ये जे पवित्र आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यास सलाम; देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तुमची शुभवर्तमानाच्या प्रसारात जी सहभागिता आहे तिच्यामुळे देवाची उपकारस्तुती करतो.

फिलिप्पैकरांस पत्र 1:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य, यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक यास: परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. जेव्हा मला तुमची आठवण होते त्या प्रत्येक वेळी मी माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो कारण पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत शुभवार्तेच्या प्रसारात तुम्ही भागीदार झाला आहात.