फिलेमोन 1:8-9
फिलेमोन 1:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे. तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
फिलेमोन 1:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे, तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.
फिलेमोन 1:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान
फिलेमोन 1:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते. परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे.