YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलेमोन 1:1-6

फिलेमोन 1:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास, आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो; कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे. आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.

सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा

फिलेमोन 1:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य, आमचा प्रिय मित्र आणि सहकारी फिलेमोन— आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना: परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो, कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे. तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो.

सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा

फिलेमोन 1:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला : तुला, आमची बहीण अफ्फिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला, व तुझ्या घरात जमणार्‍या मंडळीला; ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून : आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरवसा ह्यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनांत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो; आणि असे मागतो की, तुमच्यामध्ये [असलेल्या ख्रिस्त येशूमध्ये] जे काही चांगले आहे त्याचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण सफळ व्हावे.

सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा

फिलेमोन 1:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की, श्रद्धेमधील तुझी सहभागिता परिणामकारक व्हावी व त्यामुळे जे चागले आपण ख्रिस्तासाठी करावे ते तुम्ही समजून घ्यावे.

सामायिक करा
फिलेमोन 1 वाचा