YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 25:1-18 - Compare All Versions

गणना 25:1-18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले. मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले. इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.” मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.” त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते. जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला. तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली. या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले. परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांस माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही. फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे. हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले. “मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली मनुष्य मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.” आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता. परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत. कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हास जाचतात.”

सामायिक करा
गणना 25 IRVMAR

गणना 25:1-18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

इस्राएली लोक शिट्टीम येथे राहत असताना, त्यांचे पुरुष तेथील मोआबी कन्यांशी व्यभिचार करू लागले, त्या कन्यांनी इस्राएली पुरुषांना त्यांच्या दैवतांच्या यज्ञास बोलाविले. लोकांनी त्या यज्ञांचे भोजन खाल्ले आणि त्या दैवतांना नमन केले. अशा प्रकारे इस्राएली लोक बआल-पौराशी जडले आणि याहवेहचा कोप त्यांच्याविरुद्ध भडकला. याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.” तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.” त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली. जेव्हा अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने हे पाहिले, तेव्हा तो समुदायातून उठला व त्याने आपल्या हाती एक भाला घेतला आणि त्यांच्यामागे तंबूत गेला व त्या दोघांच्या म्हणजेच तो इस्राएली पुरुष व ती स्त्री यांच्या पोटात तो भाला भोसकला, तेव्हा इस्राएलच्या लोकांमधून पीडा थांबली; परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारचा पुत्र फिनहासने इस्राएलवरील माझा क्रोध शांत केला आहे. कारण लोकांमधील माझ्या सन्मानाविषयी मी जितका ईर्ष्यावान आहे तितकाच तो सुद्धा होता म्हणून मी माझ्या ईर्षेने त्यांचा नाश केला नाही. म्हणून त्याला सांग मी त्याच्याशी शांतीचा करार करीत आहे. तो व त्याच्या वंशजासाठी हा सर्वकाळच्या याजकपणाचा करार असणार, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या सन्मानासंबंधी ईर्ष्यावान होता आणि इस्राएली लोकांसाठी त्याने प्रायश्चित केले.” मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता. आणि ज्या मिद्यानी स्त्रीला जिवे मारण्यात आले होते तिचे नाव कजबी होते, जी मिद्यानी घराण्याच्या कुळाचा पुढारी सूरची कन्या होती. याहवेह मोशेला म्हणाले, “मिद्यानी लोकांना शत्रू समजून त्यांना जिवे मारा. कारण त्यांनी तुम्हाला शत्रू मानले, जेव्हा पेओरच्या घटनेत तुम्हाला फसविण्यासाठी आपली बहीण, मिद्यानी पुढार्‍याची मुलगी कजबी हिचा त्यांनी उपयोग केला व त्या घटनेमुळे पीडा आली, तेव्हा तिला जिवे मारण्यात आले.”

सामायिक करा
गणना 25 MRCV

गणना 25:1-18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

इस्राएल लोक शिट्टिमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञांस बोलावू लागल्या; तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्राएल लोक बआल-पौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला; आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.” तेव्हा मोशे इस्राएलांच्या न्यायाधीशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बआल-पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा.” त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली. ते पाहून अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने मंडळीतून उठून हातात बरची घेतली, आणि तो त्या इस्राएल पुरुषाच्या पाठोपाठ डेर्‍याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतांना, म्हणजे त्या इस्राएल पुरुषाला व त्या बाईला पोटात बरचीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. तरी मरीने चोवीस हजार लोक मेले. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही. म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो. त्याच्यासाठी व त्याच्यामागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरचा याजकपदाचा करार होय; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त केले.” मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्राएली पुरुषाचे नाव जिम्री होते. हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलांच्या घराण्यातील सरदार होता. जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते; एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिद्यान्यांचा पिच्छा पुरवून त्यांच्यावर मारा कर; कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हांला भुरळ घालून त्रस्त केले आहे.” कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जातबहीण होती; पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जिवे मारले.

सामायिक करा
गणना 25 MARVBSI