गणना 14:1-2
गणना 14:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले. इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
सामायिक करा
गणना 14 वाचागणना 14:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले. सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!
सामायिक करा
गणना 14 वाचागणना 14:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.
सामायिक करा
गणना 14 वाचा