गणना 11:31-32
गणना 11:31-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता. लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
गणना 11:31-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग याहवेहकडून वारा वाहिला आणि समुद्रावरून लावे पक्षी आणले. आणि छावणीच्या सभोवती, एकंदर एकएक दिवसाच्या वाटेपर्यंत सर्व दिशेने सुमारे दोन हात उंचीचा थर पसरला. त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.
गणना 11:31-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वार्याने समुद्रावरून लावे आणले; ते छावणीवर व छावणीसभोवती इतके आले की, छावणीच्या मागे व पुढे एकेक दिवसाच्या अंतरापर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे दोन हात उंचीचा थर जमला. लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले; ज्याने सर्वांत कमी गोळा केले त्याचे दहा होमर भरले; आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चारही बाजूंना पसरून ठेवले.