गणना 11:13-15
गणना 11:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे! मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे. जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
गणना 11:13-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’ मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे. तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”
गणना 11:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या सर्व लोकांना पुरवायला मी मांस कोठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की, आम्हांला खायला मांस दे. मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक; तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही.”