गणना 1:1-2
गणना 1:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला, सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.
गणना 1:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले: “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.
गणना 1:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वर सीनाय रानातील दर्शनमंडपात मोशेशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर