YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 7:4-73

नहेम्या 7:4-73 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे. बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरूशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला. जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे: परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर, शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर, आरहचे वंशज सहाशें बावन्न. येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा, एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न, जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस, जक्काईचे वंशज सातशे साठ. बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस, बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस, अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट. बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट, आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न, हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव, हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस. बेसाईचे वंशज तीनशे चोवीस, हारिफाचे वंशज एकशे बारा, गिबोनाचे वंशज पंचाण्णव, बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी. अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस, बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस, किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस, रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस. मिखमाशाची माणसे एकशे बावीस, बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस, दुसऱ्या नबोची माणसे बावन्न, दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न. हारीमाचे वंशज तीनशे वीस, यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस, लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस, सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस. याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न, पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस, हारीमाचे वंशज एक हजार सतरा. लेवी:होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर गाणारे:आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस, द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस. हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज, केरोस, सीया, पादोन लबाना, हगाबा, सल्माई हानान, गिद्देल, गहार. राया, रसीन, नकोदा गज्जाम, उज्जा. पासेहा बेसई, मऊनीम, नफूशेसीम. बकबूक, हकूफ, हर्हूराचे बसलीथ, महीद, हर्शा बार्कोस, सीसरा, तामह नसीहा आणि हतीफा शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा याला, दार्कोन, गिद्देल शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन. मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस. आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई). काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले. अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते. सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते. यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या. त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे, चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती. घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली. काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले. इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली. अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.

सामायिक करा
नहेम्या 7 वाचा

नहेम्या 7:4-73 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती. नंतर माझ्या परमेश्वराने शहराच्या सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व सामान्य नागरिकांना एकत्र करून वंशावळ्यांप्रमाणे त्यांची नोंदणी करावी असे विचार माझ्या मनात घातले. जे सर्वप्रथम परतले त्यांच्या वंशावळ्याची नावनिशी मला सापडली. तिच्यात असे लिहिले होते: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्‍याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह): यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली लोकांची नावे ही: पारोशचे वंशज 2,172, शफाट्याहचे 372, आरहचे 652, पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,818, एलामचे 1,254, जत्तूचे 845, जक्काईचे 760, बिन्नुईचे 648, बेबाईचे 628, अजगादचे 2,322, अदोनिकामचे 667, बिग्वईचे 2,067, आदीनचे 655, हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98, हाशूमचे 328, बेसाईचे 324, हारीफचे 112, गिबोनचे 95, या ठिकाणातून पुरुष: बेथलेहेम व नटोफाहचे 188, अनाथोथचे 128, बेथ-अजमावेथचे 42, किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743, रामाह व गेबाचे 621, मिकमाशचे 122, बेथेल व आयचे 123, दुसऱ्या नबोचे 52, दुसऱ्या एलामचे 1,254, हारीमचे 320, यरीहोचे 345, लोद, हादीद व ओनोचे 721, सनाहाचे 3,930. याजक: यांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973, इम्मेरचे 1,052, पशहूरचे 1,247, हारीमचे 1,017. लेवी: यांचे वंशज: येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74. संगीतकार: आसाफचे वंशज 148. मंदिराचे द्वारपाल: यांचे वंशज: शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे, शोबाईचे, एकूण 138. मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे, केरोसचे, सीयाचे, पादोनचे, लबानाहचे, हगाबाहचे, शलमाईचे, हानानचे, गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे, रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे, उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे, मऊनीमचे, नफूसीमचे, बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे, बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे, बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे, नसीयाहचे व हतीफाचे. शलोमोनच्या सेवकांचे वंशज: पोकेरेथ-हस्सबाईम व आमोन. यांचे वंशज: सोताईचे, सोफेरेथचे, पेरीदाचे, यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे, शफाट्याहचे, हत्तीलचे, पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे, आमोनचे, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392. याच वेळी पर्शियाचा तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत: ते यांचे वंशज होते: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 642. आणि याजक पितृकुळातील: यांचे वंशज: हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते). यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले. यास्तव राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणातील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही. सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते. याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 245 गायक व गायिका होत्या. त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 गाढव, 435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती. त्यांच्यातील काही पुढार्‍यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले. काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक सोने, 2,200 मीना चांदी दिली. बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले. इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.

सामायिक करा
नहेम्या 7 वाचा

नहेम्या 7:4-73 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्यापि घरे बांधली नव्हती. सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व तिच्यात हे लिहिलेले सापडले : बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यांतले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुशलेमेस व यहूदातील आपापल्या नगरांत परत गेले ते हे : येशूवा, नहेम्या, अजर्‍या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम, व बाना. जे जरूब्बाबेलबरोबर आले ते हेच. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची संख्या ही होती : परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर. शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर. आरहाचे वंशज सहाशे बावन्न. येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा. एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न. जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस. जक्काईचे वंशज सातशे साठ. बिन्नुईचे वंशज सहाशे अठ्ठेचाळीस. बेबाईचे वंशज सहाशे अठ्ठावीस. अजगादाचे वंशज दोन हजार तीनशे बावीस. अदोनीकामाचे वंशज सहाशे सदुसष्ट. बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट. आदीनाचे वंशज सहाशे पंचावन्न. हिज्कीयाच्या आटेराचे वंशज अठ्ठ्याण्णव. हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस. बेसाईचे वंशज तीनशे चोवीस. हारीफाचे वंशज एकशे बारा. गिबोनाचे वंशज पंचाण्णव. बेथलेहेम व नटोफा येथील माणसे एकशे अठ्ठ्याऐंशी. अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस. बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस. किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ येथील माणसे सातशे त्रेचाळीस. रामा व गेबा येथील माणसे सहाशे एकवीस. मिखमासाची माणसे एकशे बावीस. बेथेल व आय येथील माणसे एकशे तेवीस. दुसर्‍या नबोची माणसे बावन्न. दुसर्‍या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न. हारीमाचे वंशज तीनशे वीस. यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस. लोद, हादीद व ओनो ह्यांचे वंशज सातशे एकवीस. सनावाचे वंशज तीन हजार नऊशे तीस. याजक : यदयाच्या कुळातील येशूवाच्या घराण्यातील नऊशे त्र्याहत्तर. इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न. पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस. हारीमाचे वंशज एक हजार सतरा. लेवी : येशूवाचे वंशज, कदमीएलाचे होदवाच्या वंशजांतले, चौर्‍याहत्तर. गाणारे : आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस. द्वारपाळ शल्लूमाचे वंशज, अटेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज, एकशे अडतीस. नथीनीम : सीहाचे वंशज, हशूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज, केरोसाचे वंशज, सीयाचे वंशज, पादोनाचे वंशज, लबोनाचे वंशज, हगाबाचे वंशज, सल्माईचे वंशज, हानानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहाराचे वंशज, रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफूशेसीमाचे वंशज, बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज, बसलीथाचे वंशज, महीदाचे वंशज, हर्षाचे वंशज, बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज, नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज. शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परिदाचे वंशज. यालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज. शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, हस्सबाइमाच्या पोखरेथाचे वंशज, आमोनाचे वंशज. सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच; पण ते इस्राएलांपैकी होते की नव्हते ह्याविषयी त्यांना आपापले पितृकूळ व आपापली वंशावळी दाखवता आली नाही; दलायाचे वंशज, तोबीयाचे वंशज, नकोदाचे वंशज, सहाशे बेचाळीस. याजकांपैकी : हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्लयाचे वंशज; ह्या बर्जिल्लयाने गिलादी बजिल्लय ह्याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले, आणि त्याचे नाव घेतले. ह्यांनी आपल्या वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रांत शोधून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यांना याजकपदाच्या यादीतून काढून टाकले. तिर्शाथा (प्रांताधिपती) ह्याने त्यांना सांगितले की, “उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाऊ नयेत.” सर्व मंडळीतले लोक मिळून बेचाळीस हजार तीनशे साठ भरले; त्यांखेरीज त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दास-दासी व दोनशे पंचेचाळीस गाणारे व गाणारणी होत्या. त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस, उंट चारशे पस्तीस व गाढवे सहा हजार सातशे वीस एवढी होती. पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी ह्या कार्यास मदत केली. तिर्शाथाने एक हजार दारिक1 सोने, पन्नास कटोरे व पाचशे तीस याजकीय वस्त्रे एवढी भांडारात जमा केली. पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी ह्या कामाच्या खजिन्यात वीस हजार दारिक सोने, आणि दोन हजार दोनशे माने1 रुपे पावती केले. वरकड लोकांनी वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि सदुसष्ट याजकीय वस्त्रे पावती केली. ह्या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक; नथीनीम व सर्व इस्राएल आपापल्या नगरांत राहू लागले. सातवा महिना आला तेव्हा सर्व इस्राएल आपापल्या नगरात होते.

सामायिक करा
नहेम्या 7 वाचा