नहेम्या 13:1-2 - Compare All Versions
नहेम्या 13:1-2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यादिवशी मोशेचे पुस्तक सर्व लोकांस ऐकू जाईल अशाप्रकारे मोठ्याने वाचले गेले. त्या पुस्तकात त्यांना हा नियम लिहिलेला आढळला: कोणत्याही अम्मोनी आणि मवाबी व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये कधीही मिसळता येणार नाही. या लोकांनी इस्राएली लोकांस अन्न आणि पाणी दिले नव्हते. परंतु बलामाने इस्राएलींना शाप द्यावा म्हणून त्यांनी त्यास पैसेही देले होते. पण आपल्या देवाने त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर केले.
नहेम्या 13:1-2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये, कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.)
नहेम्या 13:1-2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांना वाचून दाखवण्यात आला; त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मवाबी ह्यांना देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे; कारण ते अन्नपाणी घेऊन इस्राएल लोकांना सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले; तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला.